Skip to content Skip to footer

कंगना रनौतनं पुन्हा एकदा करण जोहरवर साधला निशाणा; इंटरव्ह्यूमध्ये ‘फ्रस्ट्रेटेड सेक्स’ संदर्भात होते चर्चा

महाराष्ट्र बुलेटिन : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘थलाईवी’ लवकरच पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूपच आवडला आहे. कंगना रनौत सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, कंगनाने पुन्हा एकदा करण जोहरवर नेपोटीझम संदर्भात निशाणा साधला आहे. करण जोहर आणि नेपोटीझमवर बोलण्याची एकही संधी कंगना सोडत नाही.

कंगना रनौत नेच सर्वात आधी निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या टॉक शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये करण जोहरवरच नेपोटीझमचा आरोप केला होता. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर देखील कंगना रनौतने करण जोहरवर नेपोटीझम संदर्भात जोरदार हल्ला चढविला होता. दरम्यान पुन्हा एकदा कंगना रनौतने अभिनेत्री आणि टॉक शो होस्ट सिमी ग्रेवालच्या मुलाखतीची प्रशंसा करत करण जोहरला लक्ष्य केले आहे. तसेच कंगनाने सिमी ग्रेवालद्वारे घेतलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मुलाखतीचे कौतुक देखील केले आहे.

कंगना रनौतचा आगामी चित्रपट ‘थलाईवी’ चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सिमी ग्रेवालने घेतलेली जयललिता यांची मुलाखत खूप व्हायरल होत आहे. सिमी ग्रेवाल यांच्या मुलाखतीसंदर्भात एका ट्विटर युजरने लिहिले की, ‘मी सध्या सिमी ग्रेवाल यांची मुलाखत पहात आहे. मुलाखत पाहताना मला असे वाटत आहे की यापेक्षा चांगली मुलाखत कोणीही घेऊ शकत नाही. हल्लीच्या टॉक शो मध्ये प्रामाणिकपणा कुठेही दिसत नाही. यांचा शो (सिमी ग्रेवाल) खूप विश्वासार्ह आणि मजेदार आहे.’ कंगनाने याच ट्विटला रिट्विट करत करण जोहरवर निशाणा साधला आहे.

या युजरचे ट्विट रिट्वीट करत कंगना रनौतने लिहिले की, ‘हो, सिमी ग्रेवाल यांनी खरोखरच एका सेलिब्रिटीचे खरे रूप मुलाखतीद्वारे आपल्यासमोर मांडले आहे. ‘जया मा’ यांच्या सोबतच त्यांच्या या मुलाखतीने माझ्या रिसर्चमध्ये खूप मदत केली आहे. हे सर्व ‘पापा जो’ च्या मुलाखतीबद्दल सांगता येणार नाही, जे फक्त इतरांच्या गॉसिप, बुलिंग आणि फ्रस्ट्रेटेड सेक्सशी संबंधित असते.

Leave a comment

0.0/5