Skip to content Skip to footer

आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नांतून खेडमध्ये साकार होत आहे बोट क्लब व क्रॉकोडाईल पार्क

महाराष्ट्र बुलेटिन : खेड शहरालगत असलेल्या जगबुडी नदीमध्ये शेकडो मगरींचा वावर असल्याचे आपण अनेक वर्षांपासून पाहत आलो आहोत. कोकणाला लाभलेल्या या नैसर्गिक सौंदर्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विचार व्हावा हा प्रश्न सातत्याने लोकांच्या मनात येत होता. अखेर या प्रश्नाला आमदार योगेशदादा कदम यांनी पूर्णत्वास नेण्यासाठी पावले उचलली आहेत.

जगबुडी नदीच्या पात्रामध्ये म्हणजेच खेड शहराच्या हद्दीमध्ये बोट क्लब व क्रॉकोडाईल पार्क पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उभारला जावा यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना आता वाट मिळाली असून शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या संकल्पनेतून आणि गेल्या अनेक वर्षांच्या खेडमधील नागरिकांच्या मागणीनुसार पाहिलेले हे स्वप्न आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नांनी प्रत्यक्षात उतरणार आहे.

संबंधित कामासाठी राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे आमदार साहेब सातत्याने पाठपुरावा करत होते. दरम्यान सदर बाबीकडे एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून खेड मधील या बोट क्लब व क्रॉकोडाईल पार्कसाठी ९ कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे.

विशेष म्हणजे सदरील काम पूर्ण झाल्यावर मोठ्या प्रमाणात रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई-गोवा महामार्गावर होणार असल्याने कोकणाच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असून पर्यटक देखील इकडे अधिक आकर्षित होण्यास मदत होणार आहे. तसेच सदर प्रकल्पामध्ये नदीपात्राचे सुशोभीकरण, बोटिंगची सुविधा, पर्यटकांना राहण्यासाठी गेस्ट हाऊस, मगरींना सुरक्षितरीत्या पाहता यावे यासाठीची सुविधा अशा अनेक कामांचा समावेश असणार आहे.

एक आमदार या नात्याने त्यांच्या कारकिर्दीत हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होत असल्याने आणि नागरिकांचे स्वप्न साकार होत असल्याने आमदार योगेश कदम यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

Leave a comment

0.0/5