सुस व म्हाळुंगे गावात लसीकरण सुरु करण्यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिले निवेदन

महाराष्ट्र बुलेटिन : आज नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सुस व म्हाळुंगे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांच्या समवेत पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल व जिल्हा परिषद सी.ई.ओ. आयुष भारती यांची भेट घेतली आणि सुस व म्हाळुंगे या दोन्ही गावांमध्ये कोविड-१९ लसीकरण चालु करण्याबाबत निवेदन दिले.

कोरोनाचा खात्मा करण्यासाठी लसीकरण करणे खूप महत्वाचे आहे आणि गेल्या काही दिवसांपासून लसीकरण बंद झाल्यामुळे दोन्ही गावातील नागरिकांची लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या अनुषंगाने तातडीने पुणे मनपा व जिल्हापरिषद यांच्यात समन्वय साधून संबंधित दोन्ही गावांमध्ये लसीकरण सुरु करण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळेस केली.

यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या समवेत म्हाळुंगे गावचे सरपंच तथा शिवसेना उपतालुका प्रमुख मयुर भांडे, सुस गावच्या सरपंच अपुर्वा निकाळजे, उपसरपंच दिशा अनिल ससार, भाजपाचे युवा नेते अनिल ससार, बाळासाहेब भांडे, शशिकांत बालवडकर आदी मान्यवर त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here