Skip to content Skip to footer

जिल्हाप्रमुख माउली आबा कटके यांच्या माध्यमातून शिरूर तालुक्यात आणि शहरात शिवसंपर्क दौऱ्याचे आयोजन

महाराष्ट्र बुलेटिन : शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रात आता ठाकरे सरकारनं केलेल्या कामाची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शिरूर तालुक्यात आणि शहरात शिवसंपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माउली आबा कटके म्हणाले की, पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात शिवसंपर्क मोहीम सुरु झालेली असून आपल्या शिरूर तालुक्यात १२ तारखेपासून सदर मोहीम सुरु झालेली आहे आणि दोन दिवसांपासून आम्ही शिरूरमध्ये ही मोहीम राबवत आहोत. नुकतीच यासंदर्भात सर्व कार्यकर्त्यांची याबाबत चर्चा देखील संपन्न झालेली आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, गेल्या दीड-दोन वर्षांपासून आपण कोरोनाच्या साथीला तोंड देत आहोत. यातून लवकरात लवकर सुटका होईल या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रयत्न केले असून मोठ्या संख्येने लोकांचे प्राण वाचवण्याचे काम केले आहे. ज्या पद्धतीने संपूर्ण कोरोनाजन्य परिस्थिती हाताळली त्याबाबत संपूर्ण देशातून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान नुकतीच साहेबांची संपूर्ण देशामध्ये सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून निवड देखील झालेली आहे. त्यामित्ताने सर्व शिवसैनिकांच्या वतीने त्यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच सर्व शिवसैनिकांना अभिमान वाटेल असं काम त्यांनी केले असून सर्वसामान्य शिवसैनिक, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुका प्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख यांच्यापर्यंत आणि शिवसैनिक म्हणून सर्वसामान्यांपर्यंत आपण केलेलं काम पोहोचवण्यासाठी तसेच आपल्या गावात नगरपरिषदेत, महानगरपालिकेत, ग्रामपंचायतीचे वार्ड अशा सर्व ठिकाणी आपण किती लोकांच्या घरी गेलो, किती लोकांना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामांची मदत झाली, आपल्या भागामध्ये लसीकरण किती प्रमाणात झाले आणि ठाकरे सरकारच्या माध्यमातून झालेली दीड दोन वर्षांतील कामे हे सर्व आपल्याला या अभियानाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवायची आहेत असे देखील मत त्यांनी मांडले.

लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणूका येणार असून त्यासाठी साहेबांनी आपण केलेली कामे ही तळागाळापर्यंत पोहोचावीत, ज्या ठिकाणी संघटना कमजोर असेल तिथे संघटनांची बांधणी करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून यानिमित्ताने सर्वांचे अतोनात प्रयत्न सुरु आहेत. पक्ष वाढवण्याचे काम प्रत्येक पक्ष करत असतो त्याचाच एक भाग म्हणून सदर शिवसंपर्क मोहीम सुरु आहे असे मत देखील माउली आबा कटके यांनी मांडले आणि पंचायत समिती गण, जिल्हा परिषदेचे गट, त्या गटातील समस्या, त्या गटातील विषय, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येणारी कामे असतील, त्यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा, घनकचरा, ड्रेनेज किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्या संदर्भातील सर्व प्रस्ताव शिवसेना भवन कडे सादर केली आहेत असे देखील त्यांनी बोलताना सांगितले.

या दौऱ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख माउली आबा कटके यांनी सर्व उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. यावेळी जिल्हा संघटक नगरसेवक संजय देशमुख, महिला जिल्हा संघटक श्रद्धा कदम, जिल्हा सल्लागार अनिल काशीद, उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार, उपजिल्हा महिला संघटिका शैलेजा दुर्गे, तालुकाप्रमुख सुधीर फराटे, मच्छिन्द्र गदादे, शिवसेना शहरप्रमुख मयूर थोरात, उपशहर प्रमुख सुरेश गाडेकर, पप्पू गव्हाणे, संदीप जामदार, संतोष पवार, सुनील परदेशी, गोरख करंजुले, नितीन जामदार, तालुका ग्राहक कक्ष अनिल पवार, संतोष काळे, लाला लोखंडे, शुभम माळी, निखिल केदारी, गणेश जाधव, विनोद मधने, निखिल शिंदे, अमोल गोरे, नवनाथ गायकवाड, स्वप्नील शिंदे, सनी थोरात, सुनील जठार, पोपट धवळे आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5