Skip to content Skip to footer

विभाग क्र.१ व २ (उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ) येथील युवासेना पदाधिकारी शिबिर उत्साहात पार पडले!!

विभाग क्र.१ व २ (उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ) येथील युवासेना पदाधिकारी शिबिर उत्साहात पार पडले!!

येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने शिवसेना विभाग क्रं १ व २ (उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ) मधील युवासेना पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिरासाठी प्रमुख वक्ते म्हणून युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई, तसेच आमदार व वि. प्रमुख श्री. विलास पोतनीस, महिला विभाग संघटक सौ. सुजाता शिंगाडे, महिला विभाग संघटक सौ.मनाली चौकीदार, श्री. अमोल किर्तीकर सर्व युवासेना कार्यकारिणी सदस्य यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिराचे आयोजन उत्तम रित्या पार पाडण्यासाठी सर्व आयोजकांचे व उपस्थित युवासैनिकांचे मन:पूर्वक आभार!!

मा. युवासेना प्रमुख, नामदार श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा संकल्प युवासैनिकांनी केला.

Leave a comment

0.0/5