Skip to content Skip to footer

षण्मुखानंद सभागृहामध्ये ५० टक्के उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा होणार

मुंबई :मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये ५० टक्के उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे.शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावादेखील हॉलमध्येच होणार आहे.

शिवसैनिकांसाठी विचाराचं सोनं लुटण्याचा दिवस म्हणजे दसरा मेळावा. पण सलग दुसऱ्या वर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार नाही. पण शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा निश्चित झालीय.

मेळाव्याला मुंबईतले काही नगरसेवक,आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री,उपनेते तसंच महापौर उपस्थित राहणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य शिवसैनिकांना या दसऱ्या मेळाव्याला उपस्थित राहता येणार नाही.

Leave a comment

0.0/5