Skip to content Skip to footer

आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार :राष्ट्रवादी

मुंबई:राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यात असल्याचं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची चौकशी करण्यात येत आहे. तपासाचा न डगमगता सामना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

पुढील तीन ते चार महिन्यात राज्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुका होणार आहेत. या 36 जिल्ह्यांची जबाबदारी मंत्र्यांना सोपवण्यात आली आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सणासुदीचे दिवस असल्यामुळे दुकाने आणि हॉटेलच्या वेेळेत वाढ करण्याबाबत बैठकीत एकमत झाले आहे, असं नवाब मलिकांनी सांगितलं. यावरून मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Leave a comment

0.0/5