समाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’ देऊन करण्यात आला गौरव……
मुंबई महानगरपालिका व संत रोहिदास समन्वय समिती-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जगतगुरु संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. मयुर कांबळे यांना मुंबई शहरात समाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘विशेष सन्मान’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार मुंबईच्या माजी महापौर सौ. स्नेहलताई आंबेकर यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार प्रदान सोहळा करीरोड येथील ना.म.जोशी शाळेच्या सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी माजी आमदार श्री. बाबुराव माने, समन्वय समिती अध्यक्ष श्री. सुर्यकांत आंबेकर, डॉ. शांताराम कारंडे, श्री.राजेश खाडे, श्री.जगन्नाथ वाघमारे, श्री.राजु नेटके यांच्यासह समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते. श्री. मयुर चंद्रकांत कांबळे यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतक यांनी जल्लोष साजरा केला.