Skip to content Skip to footer

बजाज ऑटोकडून सवलतींचा वर्षाव 

discount from bajaj autoमुंबई – बजाज ऑटोने दुचाकींवर तीन सवलती जाहीर केल्या आहेत. नवीन दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक वर्षासाठीचा विमा मोफत दिला जाणार आहे. सर्व दुचाकींवर पाच वर्षांची एक्‍सटेंडेड वॉरंटी दिली जाईल. शिवाय अतिरिक्‍त एक वर्ष निःशुल्क सर्व्हिस दिली जाणार आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत ही सवलत योजना लागू असेल, असे बजाज ऑटोने म्हटले आहे. ‘‘ग्राहकांसाठी हॅटट्रिक ऑफर जाहीर करताना आनंद होत आहे. या सर्व सवलतींचे एक वेगळे वैशिष्ट्य असून, यामुळे बजाजच्या विक्रीत वाढ होईल,’’ असा विश्‍वास बजाज ऑटोच्या मोटारसायकल विभागाचे अध्यक्ष एरिक वास यांनी व्यक्त केला. सर्व वितरकांकडे ही ऑफर उपलब्ध आहे.

Leave a comment

0.0/5