Skip to content Skip to footer

सोने साडेतीनशे रुपयांनी स्वस्त

Gold price fall downमुंबई – सणासुदीचा अभाव आणि सराफा बाजारातील मागणी रोडावल्याने बुधवारी (ता.१८) सोने तब्बल साडेतीनशे रुपयांनी स्वस्त झाले. दिवसअखेर सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला २९ हजार ७०५ रुपयांवर स्थिरावला. चांदीच्या भावात प्रति किलोमागे ६३५ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली.

जागतिक कमोडिटी बाजारातील मंदी ग्राहकांच्या पथ्यावर पडली आहे. खनिज तेल, मौल्यवान धातूंच्या किमतींमधील घसरणीचे पडसाद स्थानिक सराफा बाजारपेठेवर उमटले. सोन्याचा भाव ३० हजारांखाली आल्याने ग्राहकांना खरेदी संधी उपलब्ध झाली आहे. जागतिक बाजारात सोने प्रतिऔंस ०.३ टक्‍क्‍यानी घसरले असून १ हजार २३३.११ डॉलरवर बंद झाले. चांदीचा भाव ०.९ टक्‍क्‍यांनी घसरून १५.४१ डॉलरवर बंद झाला.

Leave a comment

0.0/5