Skip to content Skip to footer

निर्देशांकांचा उच्चांकी प्रवास सुरूच

मुंबई – मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीचा उच्चांकी प्रवास मंगळवारी सुरूच राहिला. सेन्सेक्‍स आज १०६ अंशांनी वधारून ३६ हजार ८२५ अंशांवर बंद झाला, तर निफ्टी ४९ अंशांची वाढ होऊन ११ हजार १३४ अंशांवर बंद झाला.

सेन्सेक्‍स आणि निफ्टी आज सार्वकालिक उच्चांकी पातळीवर बंद झाले. कालही सेन्सेक्‍स उच्चांकी पातळीवर बंद झाला होता. आज सेन्सेक्‍सने ३६ हजार ९०२ अंशांची उच्चांकी पातळी गाठली. याआधी निफ्टी २९ जानेवारीला ११ हजार १३० अंश या उच्चांकी पातळीवर बंद झाला होता. आज ही पातळी ओलांडून तो ११ हजार १३४ अंशांवर बंद झाला.

परकी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर शेअर बाजारात वाढला आहे. काही कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले लागल्याने गुंतवणूकादारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यातच जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणाचाही चांगला परिणाम होत आहे.

तेजीच्या लाटेवर 
एल ॲण्ड टी, एशियन पेंट्‌स, वेदांत, टाटा स्टील, कोल इंडिया, एम ॲण्ड एम, अदानी पोर्टस, मारुती सुझुकी, ॲक्‍सिस बॅंक, एचडीएफसी, पॉवर ग्रीड, ओएनजीसी, टाटा मोटर्स, आयटीसी, इंड्‌सइंड बॅंक, एचडीएफसी बॅंक आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांच्या समभागात ३.३६ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली.

एसीसीमध्ये १२.८६ टक्के वाढ 
सिमेंट क्षेत्रातील एसीसी कंपनीच्या समभागात आज १२.८६ टक्के वाढ झाली. कंपनीच्या पहिल्या तिमाही नफ्यात किरकोळ वाढ झाली आहे. कंपनीला ३२९ कोटी रुपयांचा तिमाही नफा झाला आहे. गुंतवणूकदारांनी पसंती दिल्याने कंपनीच्या समभागात तेजी निर्माण झाली.

https://maharashtrabulletin.com/hdfc-mutual-fund-investment-ipo/

Leave a comment

0.0/5