खासदार माने यांच्या मागणीला यश कोल्हापुर जिल्हा रेशीम उद्योग जिल्हा म्हणुन जाहिर

खासदार माने यांच्या मागणीला यश कोल्हापुर जिल्हा रेशीम उद्योग जिल्हा म्हणुन जाहिर

                     कोल्हापूर जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. परंतु आज कमी-अधिक प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे. ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे हाताला आलेले पीक पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या हाताला दुसरा जोडधंदा मिळावा म्हणून खासदार धैर्यशील माने यांनी वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन एकात्मिक रेशीम पार्कच्या मागणीचे निवेदन पत्र दिले होते.

                    मंत्री स्मुर्ती इराणी यांनी खासदार माने यांच्या पत्राची दाखल देत पंतप्रधान कार्यालयातून पन्नास जिल्हे – पन्नास उत्पादन हा प्रकल्प जाहीर झाला आहे. या प्रकल्पातंर्गत आता कोल्हापूर जिल्हयासाठी रेशीम उत्पादन दिले जाणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे खासदार माने यांच्या मागणीला यश मिळाले आहे. रेशीम उत्पादन व्यवसाय हा महत्वाचा कृषी कुटीर उद्योग मानला जातो. रेशीम कीडय़ांद्वारे रेशीम धाग्यांचे उत्पादन घेतले जाते. यात रेशीम कीडय़ांच्या संगोपनासाठी तुतीच्या झाडांची लागवड, कोषनिर्मिती, प्रक्रिया आणि विणकाम या प्रवासातून रेशीम तंतू निर्मिती होते. कोल्हापूरातील हवामान रेशीम उद्योगास अनुकूल आहे.

                  रेशीम उत्पादनासाठी जेणे करून पारंपरिक पिकांव्यतिरिक्त रेशीम शेतीवर शेतकऱ्यांनी भर दिल्यास त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचा स्रोत वाढण्यास मोठी मदत होऊ शकते. या निर्णयामुळे रेशीम उद्योगाचा विकास व विस्तार कोल्हापूर जिल्हयातून होणार आहे. याचा सर्वाधिक लाभ जिल्हयातील शेतकऱ्यांना होणार आहे, तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि आर्थिक प्रगतीची क्षमता विकसीत मदत होईल.

माणगांव परीषदेच्या शताब्दी महोत्सवाच्या पुर्वतयारीची खासदार मानेंनी केली पाहाणी.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here