सेल्फीच्या बहाण्याने दोन चाहत्यांचं जॅकलिन शी गैरवर्तन

जॅकलिन फर्नांडिस-twins-misbehaves-with-Jacqueline-judwaa2
जॅकलिन फर्नांडिस

मुंबई : चाहत्यांनी अभिनेत्रींशी गैरवर्तन करण्याचा प्रकार बॉलिवूडसाठी नवीन नाही. नुकतंच एलियाना डिक्रुझने मुंबईत तिला आलेला अनुभव शेअर केला होता. त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोबत सेल्फी घेण्याच्या बहाण्याने दोघा चाहत्यांनी तिच्याशी गैरवर्तन केल्याचं वृत्त आहे.

https://maharashtrabulletin.com/ileana-dcruz-tweet/

जुडवा 2 चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी काँटेस्ट जिंकलेल्या 50 जुळ्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. बक्षीस म्हणून वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्यासोबत काही वेळ घालवण्याची संधी त्यांना मिळणार होती.

दोघा चाहत्यांना तिच्यासोबत सेल्फी काढायचा होता, मात्र त्यांनी नको तितकी जवळीक साधत जॅकलिनशी गैरवर्तन केल्याचा आरोप होत आहे.

https://maharashtrabulletin.com/movie-hindi-judwaa-2/

अखेर अभिनेता वरुण धवने मध्यस्थी करत दोघांना हाकलून लावलं. मात्र या प्रकारामुळे तीन कलाकारांसोबत चाहत्यांना कमी वेळ घालवता आला.

अधिक माहितीसाठी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here