Skip to content Skip to footer

टायगर जिंदा है : चित्रपट रिव्यू – तिकीट काढण्याआधी हे पहा

दिग्दर्शक कबीर खानने ‘एक था टायगर’मध्ये भारतीय गुप्तहेर यंत्रणा ‘रॉ’ आणि पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ संघटनेच्या एजंटमधली प्रेमकहाणी मोठ्या खुबीने रंगवली होती. एका मिशनवर असलेले गुप्तहेर सलमान खान आणि कतरिना कैफ प्रेमात पडतात. मिशन पूर्ण होताच ते गायब होतात. दोन्ही एजन्सींना त्यांचा पत्ता लागत नाही. टायगर जिंदा है च्या निमित्ताने दिग्दर्शक अली अब्बास जफरने त्यांना पुन्हा शोधलंय. कारणच तसं होतं.

इराकमध्ये एक दहशतवादी संघटना एका हॉस्पिटलमधील 25 भारतीय आणि 15 पाकिस्तानी नर्सना ओलिस ठेवते. अमेरिकी हल्ल्यात जायबंदी झालेला त्यांचा म्होरक्‍या अबू इस्माईल तिथे उपचार घेत असतो. अमेरिका त्यांच्यावर हवाई हल्ला करण्याच्या तयारीत असते. दहशतवाद्यांचा तळ बेचिराख करण्याचा त्यांचा इरादा असतो; पण भारताची ‘रॉ’ संघटना त्यांना रोखते. भारताला आपल्या 25 नर्सना वाचवायचं असतं. अमेरिका त्यासाठी आठवड्याची मुदत देते… मग सुरू होतो शोध टायगरचा. अर्थात सलमान खानचा. ऑस्ट्रियाच्या बर्फाच्या पर्वतराजीत पत्नी झोया (कतरिना कैफ) आणि मुलासोबत राहणाऱ्या सलमानचा शोध आठ वर्षांनी लागतो. कुटुंबात रमलेला टायगर मिशनसाठी आधी तयार होत नाही. सर्वस्व असलेल्या बायको-मुलांची जबाबदारी त्याच्या देशप्रेमापेक्षा सरस ठरते अन्‌ तो इराकमधील मिशनला नकार देतो; पण कतरिना त्याच्या भीतीवर मात करून त्याला राजी करते. शेवटी अर्थातच मिशन फत्ते…

http://nashikbulletin.com/thackeray-movie-nawazuddin-siddiqui/

टायगर जिंदा है म्हटला तर सिक्वल आहे; परंतु सिनेमाची कथा मागील पानावरून पुढे नेण्यात आलेली नाही. ‘एक था टायगर’मधल्या व्यक्तिरेखा फक्त रिपीट झाल्यात. सलमानसोबत कॅट आहे, दोघेही पुन्हा गुप्तहेर आहेत, थोडासा रोमान्स आहे, मारधाड, दारूगोळा, रॉकेट लॉन्चर, बॉम्ब, बंदुकीच्या फैरी, हवेत उडणाऱ्या गाड्या, इमोशन आणि ढेरसारी ऍक्‍शन आहे. कथा सत्य घटनेवर आधारित असली तरी अलीने एक स्पाय थ्रिलर म्हणून चांगली ट्रिटमेंट दिलीय. चांगली म्हणजे, सलमानच्या फॅन्सच्या हिशेबाने.

आधीचा सलमानचा ‘ट्युबलाईट’ आपटला. भोळाभाबडा सलमान बघवला नाही. ‘टायगर जिंदा है’च्या निमित्ताने मात्र तो परतलाय, असंच म्हणावं लागेल. फ्लॉपचा शिक्का माथी नको म्हणून आपला लक फॅक्‍टर असलेला शर्टलेस शॉटही त्याने दिलाय. सोबत ‘दबंग’ स्टाईल आहे. ग्लॅमरस कॅटची भारी ऍक्‍शनही आहे. दिग्दर्शकाने सगळा मसाला टाकलाय सिनेमात. फक्त लॉजिकचा विसर पडल्याने तो ‘क्‍लास’च्या प्रेक्षकांना बोअर करतो. सलमानच्या फिल्मना लॉजिकची गरजच नसते. त्याचे डायलॉग, ऍक्‍शन, स्टाईल अन्‌ डान्स पुरेसा असतो. ‘टायगर…’मध्ये हे सारं ओसंडून वाहतंय.

एकटा सलमान रायफलने सशस्त्र दहशतवाद्यांना गोळ्या घालतो, इकडून-तिकडे उड्या मारत त्यांना लोळवतो, घोड्यावर बसून फायटिंग करतो अन्‌ तेवढ्याच तडफेने डोकंही चालवतो म्हणजे बघा. हॉलीवूडचे स्टारही फिके पडतील त्याच्यासमोर..! त्याच्या फॅन्सना तर लॉटरीच लागलीय. असो, तरीही एक हॉलीवूड स्टाईल ऍक्‍शन फिल्म बनवण्यात दिग्दर्शक पास झालाय.

सलमानच्या एंट्रीचा एक सीन सोडला तर इतर दृश्‍यं अप्रतिम चित्रित झालीत. हॉलीवूड ऍक्‍शन दिग्दर्शक टॉम स्ट्रथर्स अन्‌ त्याच्या टीमची मेहनत जाणवते. बाकी लोकेशन्सही निसर्गरम्य आहेत. दहशतवाद्यांच्या आगीत होरपळणारे इराकमधील चित्रीकरणही परिणामकारक झालंय. भारत-पाकिस्तानमधील संबंधांवरही सिनेमात भाष्य करण्यात आलंय. देशभक्तीचा संदेशही सिनेमात आहे.

52 वर्षांच्या सलमानची जादू निश्‍चितच सिनेमात दिसते. 45 वर्षांचा टायगर त्याने साकारलाय तोही मोठ्या टेचात. कॅटबरोबरची त्याची केमिस्ट्रीही मस्त जमलीय. दोघांनी ऍक्‍शनच्या सोबतीने अभिनयही चांगला केलाय. ‘स्वॅग से करेंगे सब का स्वागत’ गाण्यावर त्यांनी धमाल आणलीय. अबू इस्माईलच्या भूमिकेत इराणी कलाकार साजिद डेलाफ्रूझने छाप पाडलीय. परेश रावलच्या अभिनयाची मजाही अनुभवता येते.

ऍक्‍शनसोबतच रोमान्सचाही तडका असलेला टायगर जिंदा है बॉक्‍स ऑफिसवर कलेक्‍शनच्या बाबतीत मोठी डरकाळी फोडणार हे नक्की.

स्टार : अडीच
एक : सलमान खान आणि कतरिना कैफची ऍक्‍शन-अभिनय
एक : खिळवून ठेवणारे दिग्दर्शन
अर्धा : सिनेमॅटोग्राफी

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5