Skip to content Skip to footer

सौ. ला खुष करण्याचे 5 उपाय (नक्की वाचा)

सध्याचे जग फार धकाधकीचे झाले आहे. पूर्वीच्या चित्रपटात दाखवतात तसे त्याने तिच्या मागे झाडामागून पळापळी करत मजा करायचे हे दिवस नव्हेत. आता तिच्याऐवजी पैश्यामागे धावत संसाराचा गाडा चालवत जमले तर कसे कुसे मजा (ती पण जमली तर) करायचे हे अनेकांचे दिवस. सहाजिकच तिला याचा कंटाळा येणे हे ठरलेले. अशा परीस्थितीत तिला खुश करण्याचे व लाईफमध्ये पुन्हा जान आणण्यासाठी स्मार्टदोस्तने काही टिप्स गोळा केल्या आहेत. खरे तर त्यालापण कंटाळा येतच असतो. पण आज आपण सौ. ला खुश करण्याच्याच टिप्स पाहुया. आणि हो सौ. खुश तर श्री. ला इन रिटर्न ख़ुशी मिळणारच ना… चला तर लाईफ मध्ये रोमान्स भरुया.

1. फुलोंकी जादू :
खरेतर ही जरा जुनी आयडीया वाटते. पण ही एक शुअर शॉट वर्क होणारी आयडीया आहे. लग्न नवीन नवीन असताना तिला फुले आणून देण्याची सुंदर गोष्ट तुम्ही करतच होता. आता जर ते थांबले असेल तर फुलांचा गुच्छ वा एखादा गजरा नक्की द्या. कामाच्या राम रगाड्यातून ती सुद्धा फुलाना विसरून गेली असते. आता तिला मुलांवर लक्ष द्यावे लागते. अशातच तुम्ही तिला फुले दिली तर तिला पुन्हा ते जुने जादूई दिवस आठवतील. मग …..

2. हातात चाकू – कढईत तेल
काहीसा विचित्र उपाय. पण कधीतरी तुमच्यातला आचारी जागा करा. एका संध्याकाळी तिला खाण्याची डिश बनवून द्या. तुम्ही “संजीव कपूर” बना असे स्मार्टदोस्तचे मत नाही पण तुमची ही डिश संसारात एक वेगळीच चव आणेल हे मात्र नक्की. जमले तर लाईट म्युझिक, अगदी मोबाईल वर लावता आले तर हे कॉम्बिनेशन खतरनाक रिझल्ट देईल. अन हो घरातल्या छोट्याना पण यात इनव्हाल्व्ह करा. लाईफच्या या फेज मध्ये तिला ते अधिक आवडेल. तर होवून जावूद्या “हातात चाकू – कढईत तेल”

3. तुमच्यातला कवीला जागा करा :
कधीतरी तुमच्या कवीमनाला वाव द्या. तिच्यासाठी एखादी कविता पंक्ती होवून जावू द्या. कविता तयार करताना “ध” ला “ध” व “म” ला असे यमक जूळायला लागते तरच कविता ही कविता होते असा चुकीचा समाज मनात ठेवू नका. भावना महत्वाच्या आहेत. यमक नव्हे. एखादी अचूक वेळ साधा अन करा जागा तुमच्यातल्या कवीला.
नसूदे कवितेमध्ये यमक… तरी पण येईल लाईफमध्ये चमक… (हा.. हा.. हा)
जोक्स अपार्ट खरेच तुमच्यातला कवीला जागा करा. तिला बरे वाटेल.

4. साथी हाथ बढाना :
साथिया या चित्रपटात हिरो अंघोळीनंतर अंग पुसून ओला टॉवेल तसाच बेडवर टाकतो. कदाचित त्याची अपेक्षा घरातील सर्व कामे तिने करावीत अशी असेल. पण मित्रानो त्यानंतर साथीयात साथीयात भांडणे होतात हे दाखवले आहे. मजल अगदी साथ सोडण्यापर्यंत जाते… असो बात टॉवेलची नाही तर सोचची आहे. घर दोघांचे आहे तेव्हा दोघांनी साथीने काम केले तर दोघानांही फायदा. कामे लवकर उरकतील, वेळ भरपूर मिळेल, आनंदही मिळेल.

5. तारीफ पे तारीफ :
तारीफ पे तारीफ करू नका पण कधीतरी तारीफ जरूर करा. “कॉम्प्लीमेंटस आर प्राईसलेस” असे म्हणतात. तेव्हा तिच्या चांगल्या दिसण्याबद्दल, एखाद्या नवीन गोष्टीबद्दल (अगदी नकळत बदललेल्या तिच्या हेअर स्टाईलबद्दल), ती घरासाठी करत असलेल्या कष्टाबद्दल चार चांगले शब्द जरूर बोला. तुमचे तिच्याकडे लक्ष आहे हे तिला जाणवूद्या. तुम्हारी ये तारीफ जरूर रंग लायेगी.

Leave a comment

0.0/5