“गोवा” – सिर्फ नामही काफी है. दोस्तांनो गोवा ह्या नावातच मस्ती, मौज अन धमाल आहे. सुटीत गोव्याला जायचे अन जग विसरून तुफानी मजा करायची असे प्रत्येकाच्या मनात असते. एकदा का जायचे ठरवले की कोणत्या बीचला काय काय बघायचे याचे प्लॅनिंग करण्यातसुद्धा जाम मजा येते. असा हा गोवा. क्रुझ वरील पार्टी, सी फूडची दावत, अन साथीला ….
तर दोस्तांनो आज तुमच्यासाठी अशीच गोवा अनुभवायची यादी तयार केली आहे. वाचा तर गोव्यातील सुंदर बिचेसची माहिती.
1. पालोलेम बीच (Palolem Beach) :
गर्द नारळाच्या बागांनी नटलेला हा दक्षिण गोव्यातील बीच. डॉल्फिन मास्याच्या दर्शनासाठी पालोलेम बिचवरून सुटणाऱ्या समुद्र सफरीतर एक प्रमुख आकर्षण. किनाऱ्याचा उत्तर भाग काहीसा शांत व कुल हॉलिडेसाठी परफेक्ट. किनाऱ्यावर निवांत पाहुडायचे अन लुटायची निळ्याशार समुद्राची फेसाळ मजा. फॉरेन टूरिस्टचे हे एक आवडते डेस्टीनेशन. गोव्यातील पालोलीम हा नक्कीच एक मस्ट सी बीच.
2. बागा बीच (Baga Beach) :
ज्यांना कुणाला पांढरी शुभ्र वाळू, किनाऱ्यावरील जान आणणाऱ्या पार्टीज होस्ट करणारी झोपडी सारखी हॉटेल्स (शॅक्स) अनुभवायची असतील त्यांना बागा म्हणजे चिल्ड डेस्टीनेशन. फॅमिलीसाठीसुद्धा पॅरासेलिंग, डॉल्फिन टूर्स, वॉटर स्पोर्ट्सचा पुरेपूर थ्रील म्हणजे बागा. शॉपिंगची मजा अन सोबत गोवन फूडचा आहार. वा क्या बात है.
3. अंजुना बीच (Anjuna Beach) :
गोव्याला जायचे तर अंजुना बीचला भेट द्यायचीच असे तरुणाईला वाटते त्याचे कारण म्हणजे अंजुनातील डान्स अन संगीत (रंगीत तर गोव्याट सगळीकडेच) म्हापश्याच्या पश्चिमेला असणाऱ्या अंजुनामध्ये हिप्पी कल्चरचा प्रभाव होता. साठ्च्या दशकात जगभरातल्या हजारो हिप्पींचे हॉट डेस्टीनेशन असणाऱ्या अंजुनाबद्दल म्हणूनच एक वेगळेच गूढ आकर्षण अनेकांच्या मनात. ट्रान्स म्युझिक व ग्रेट फूडचे किलर कॉम्बिनेशन पाहिजे तर अंजुना दी बेस्ट.
4. कलंगुट बीच (Calangute Beach) :
गोव्यातील एक फेमस बीच. पणजीपासून 15 किलोमीटरवर असणारा कलंगुट. प्रामुख्याने बाजारपेठेचे ठिकाण असणारा हा बीच सी फूड खवय्यांसाठी पैसा वसूल ठिकाण. प्रॉन्स, विविध चवदार मासे सोबत थंडगार रंगीत सरबत. अन हो! वेळ काढून सेंट अलेक्स चर्च, केरकर आर्ट म्युझियम नक्की पहा. कलंगुटमध्ये हँडमेड ज्वेलरी आणी इतर कलाकुसरीचे आयटम विकत घ्यायला विसरू नका.
5. मिरामार बीच (Miramar Beach) :
गोव्याच्या राजधानी जवळील हा बीच. लांबलचक चंदेरी सागर किनारा, सुर्यास्ताचा तांबूस रम्य अनुभव. सोबत जवळचे लाडकी मंडळी असतील तर स्वप्नवतच. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान विविध देशाचे स्थलांतरीत पक्षीसुद्धा मिरामारला भेट देतात. (बर्ड वॉचींगसाठी हे ठिकाण चांगले आहे तर…?)
गोव्यातील पाच बीचेसची माहिती तर दिलीच. इतर डोना पावला व अगुडा (Aguada) बीच हे सुद्धा मीरामार पासून जवळच.