Skip to content Skip to footer

परशाच्या जिममधील व्हिडीओला चाहत्यांचं लाईक

Akash Thosar in Gymमुंबई: सैराट सिनेमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला परशा उर्फ आकाश ठोसर सध्या जिममध्ये घाम गाळत आहे. सैराटनंतर आकाश ठोसर हा महेश मांजरेकरांच्या एफ यू या सिनेमात झळकला. मात्र या सिनेमाला म्हणावं तसं यश लाभलं नाही.

नुकतंच आकाश ठोसर ‘लस्ट स्टोरीज’ या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमध्ये झळकला होता. मात्र परशाचा आगामी प्लॅन काय, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

आकाश ठोसर आता बॉडी बनवत आहे. आगामी कोणत्या सिनेमातील लूकसाठी की केवळ फिटनेससाठी आकाश इतकी मेहनत घेत आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र परशाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांकडून लाईक्स मिळत आहेत.

TIME TO ACTIVATE BEAST MODE…  आज कुछ तुफानी करते है अशा अर्थाचं कॅप्शन त्याने व्हिडीओला दिली आहे.

या व्हिडीओत आकाश भलंमोठं वजन उचलताना दिसतो. अवजड वजन उचलण्यास त्याला ट्रेनर मदत करत आहे.

विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा:  Akash Thosar in Gym

Leave a comment

0.0/5