Skip to content Skip to footer

‘हॅपी फिर भाग जायेगी’ चा ट्रेलर रिलीज : सोनाक्षीची मुख्य भूमिका.

मुंबई : जिमी शेरगिल, सोनाक्षी सिन्हा यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘हॅपी फिर भाग जायेगी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांची हसता हसता पुरेवाट होईल.

2016 मध्ये हिट झालेल्या ‘हॅपी भाग जायेगी’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. पहिल्या भागात असलेले डायना पेंटी, जिमी शेरगिल, अली फजल, अभय देओल आणि पियुष मिश्रा सिक्वेलमध्येही झळकणार आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि पंजाबी गायक-अभिनेता जेसी गिल त्यांच्यासोबत दिसतील.

‘हॅपी फिर भाग जायेगी’ 24 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

चिनी गुंड सोनाक्षीचं अपहरण करत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसतं. तर जिमी शेरगिलचं लग्न (याही चित्रपटात) मोडल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. अली आणि डायना यांना ट्रेलरमध्ये फारसा वाव नाही.

हॅपी भाग जायेगी चित्रपटात हॅपी (डायना) संगीतकार बॉयफ्रेण्ड गुड्डू (अली) सोबत पळून जाते आणि अपघाताने पाकिस्तानात पोहचते. सिक्वेलमध्ये काय धमाल पाहायला मिळणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

 

via अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5