चकाचक प्रेम कहाणी, सलमान निर्मित ‘लव्हरात्री’ चा ट्रेलर

चकाचक प्रेम कहाणी, सलमान निर्मित 'लव्हरात्री' चा ट्रेलर | loveratri trailer salman shares video of aayush sharma warina hussain movie

मुंबई : सलमान खानने ‘लव्हरात्री’ चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरवर शेअर केला आहे. या सिनेमातून सलमानचा मेहुणा आयुष शर्मा आणि  अभिनेत्री वरिना हुसैन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

टीझरप्रमाणेच सलमानने ट्रेलरही इंग्रजी, गुजराती, उर्दू आणि हिंदी अशा चार भाषांमध्ये ट्वीट करत शेअर केला आहे. ‘लवरात्रि – यह कहानी है प्यार और मोहब्बत की’ असं कॅप्शन सलमानने दिलं आहे. 5 ऑक्टोबर 2018 रोजी ‘लव्हरात्री’ प्रदर्शित होणार आहे.

सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली ‘लव्हरात्री’ या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. लव्हरात्री हा सलमान खान फिल्म्सचा पाचवा चित्रपट आहे. चित्रपटात राम कपूर, रॉनित रॉय हे कलाकारही झळकणार आहेत.

या सिनेमाचं दिग्दर्शन अभिराज मिनावाला करत आहे. अभिराजचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. यापूर्वी त्याने फॅन, गुंडे, जब तक है जान यासारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.

लव्हरात्री हा चित्रपट आयुष शर्मासाठी मोठा ब्रेक मानला जात आहे. सलमानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांचं 2014 मध्ये लग्न झालं होतं. त्यांना अहिल हा मुलगा आहे.

अधिक माहितीसाठी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here