B’day Special : सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या महेश बाबूच्या काही खास गोष्टी !

तेलगु सिनेमांचा सुपरस्टार महेश बाबू याला साऊथ सिने इंडस्ट्रीचा शाहरुख खान म्हटलं जातं. आज याचा साऊथच्या शाहरुख खानचा वाढदिवस आहे. आज तो त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज देशभराच महेशची मोठी फॅन फॉलोईंग आहे. त्याचे वडील कृष्णा हे अभिनेते आणि आई इंदिरा या अभिनेत्री होत्या. वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच त्याने सिनेमात काम करणं सुरु केलं होतं. चला जाणून घेऊ महेश बाबूच्या काही खास गोष्टी…

चार वर्षापासून सिनेमात काम

१९७९ मध्ये महेश बाबूने तेलगु ‘नींदा’ या सिनेमाच्या सेटवर गेला होता. त्यावेळी दिग्दर्शक नारायम राव यांनी छोट्या महेशसोबत काही सीन शूट केले होते. या सिनेमातील त्याच्या कामाचं चांगलंच कौतुक झालं होतं. त्यानंतर त्याने शंखाखम, बाजार राऊडी, मुगुरु कोडुकुलू आणि नगदाचारी यासारख्या सिनेमात काम केलं.

वडिलांच्या सांगण्यावरुन सिनेमात काम

राजा कुमारुदु | Raja Kumuruduबालकलाकार म्हणून महेश बाबूने ९ सिनेमात काम केलं. पण वडिलांच्या सांगण्यावरुन महेश बाबू सिनेमापासून ९ वर्ष दूर राहिला. त्याच्या वडिलांना वाटत होतं की, त्याने आधी शिक्षण पूर्ण करावं. शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने १९९९ मध्ये ” या सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली. या सिनेमात महेश बाबूची अभिनेत्री प्रिती झींटा होती.

 

गायनातही आजमावला हात

Mahesh babu singing for businessmanमहेश बाबू याच्या अभिनयाचे तर सगळेच दिवाने आहेत. पण त्याने केवळ अभिनयातच नाही तर गायनातही हात आजमावला होता. महेश बाबूने ‘जलसा’ आणि ‘बादशाह’ सिनेमात गाणी गायली आहेत. त्यासोबत त्याने त्याच्या बिझनेसमन या सिनेमातही गाणं गायलं आहे.

 

महेश बाबूची लव्हस्टोरी

Love Story Of Mahesh Babu And Namrata Shirodkar२००५ मध्ये महेश बाबूने मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केलं. दोघेही अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांची पहिली भेट २००० मध्ये ‘वामसी’ या सिनेमावेळी झाली होती. त्यानंतर दोघे ५ वर्ष एकमेकांना डेट करत होते. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

 

 

अभिनेता म्हणून करिअर

महेश बाबूने आतापर्यंत १०० पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आहे. त्याचे जवळपास सगळेच सिनेमे सुपरहिट ठरतात. महेश बाबू हा टॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे. तो एका सिनेमासाठी १८ कोटी रुपये मानधन घेतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here