Skip to content Skip to footer

‘राह दे माँ’ वेब सीरिजचा ट्रेलर लॉन्च, राधे माँ मुख्य भूमिकेत

मुंबई : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु ‘राधे माँ’ आता छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतेय. राधे माँचे अनुयायी सर्वसामान्य लोकांपासून अगदी टेलिव्हिजन क्षेत्रातही आहेत. याचाच फायदा घेत, राधे माँ आता ‘राह दे माँ’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

राधे माँ ज्या वेब सीरिजमध्ये काम करतेय, ती काही धार्मिक किंवा आध्यात्मिक सीरिज नाहीय, हे मुद्दाम इथे नमूद करायला हवे. आणि या वेब सीरिजची हीच खासियत आहे. कारण अनेकांनी गृहित धरलं असणार की, राधे माँ काम करणार म्हटल्यावर धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रम असेल. पण तसे नाहीय.

वेब सीरिजच्या ट्रेलर लॉन्चिंगच्या कार्यक्रमातही राधे माँने आपला वेगळेपणा दाखवला. अगदी ‘मॉडर्न लूक’मध्ये राधे माँ ट्रेलर लॉन्चिंगच्या कार्यक्रमात पोहोचली. ही वेब सीरिज राधे माँच्या आयुष्यावर आधारित असल्याचे कळते आहे.

पहा ट्रेलर :

गेल्या काही दिवसांपासून ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमातील राधे माँचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यामुळे अनेकजण या फोटोबाबत तर्क लढवत होते. मात्र हे फोटो या कार्यक्रमातील असल्याचे आता उघड झाले आहे.

या वेब सीरिजमधून राधे माँच्या आयुष्यातील चढ-उतार दाखवले जाणार आहेत. तिच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांवर आधारित ही वेब सीरिज असेल.

स्वत: राधे माँ ‘राह दे माँ’ ही वेब सीरिज प्रोड्युस करत आहे. त्याचसोबत राधे माँ या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकाही साकारत आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5