अद्याप सारा अली खान चा डेब्यू चित्रपटही रिलीज झालेला नाही. पण त्याआधीचं सैफ अली खानची लेक बड्या स्टार्सप्रमाणे बिझी झाली आहे. याच कारणामुळे सारा ‘हिंदी मीडियम2’मधून बाहेर पडली आहे.
डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, साराने या चित्रपटाला नकार दिला. २०१६ मध्ये रिलीज झालेल्या इरफान खान स्टारर ‘हिंदी मीडियम’च्या सीक्वलची तयारी सुरू झाली आहे. या चित्रपटासाठी सैफ अली खान व सारा अली खान ही रिअल लाईफ बाप-लेकीची जोडी मेकर्सची पहिली पसंत होती. सैफ व साराला या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवली गेली होती. दोघांनीही चित्रपट साईन केला नव्हता. पण तो करण्याचा शब्द दिला होता. पण आता म्हणे, साराने या चित्रपटातून अंग काढून घेतले. हा चित्रपट सोडून आपल्या डेट्स तिने अन्य कुठल्या प्रोजेक्टसाठी दिल्यात. विशेष म्हणजे, साराने हा चित्रपट सोडताचं सैफनेही या चित्रपटाला नकार कळवला. कारण सारा यात लीड रोलमध्ये होती, म्हणून सैफने यास होकार दिला होता. पण आता साराचं नाही म्हटल्यावर त्यालाही या चित्रपटात इंटरेस्ट उरला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान खानच्या आजारानंतर ‘हिंदी मीडियम2’चे शूटींग रोखण्यात आले होते. पण अलीकडे चित्रपटाचे निर्माते दिनेश विजान व दिग्दर्शक होमी अदाजानिया यांनी इरफानला स्क्रिप्ट ऐकवली. रिकव्हरी फेजमध्ये असलेल्या इरफानने म्हणे या चित्रपटासाठी होकार दिला आहे. ‘हिंदी मीडियम2’मध्ये दहा वर्षांचा गॅप दाखवला जाणार आहे़ त्यामुळे सारा मेकर्सची पहिली पसंत होती.