Skip to content Skip to footer

नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता वाद ; गृहराज्यमंत्र्यांनी घेतली नानांची बाजू

मुंबई | अभिनेते नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्या वादात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नानांची बाजू घेतली आहे. तनुश्रीने केलेल्या आरोपांवर केसरकरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

तनुश्रीने केलेल्या आरोपांबाबत तिच्याकडे ठोस पुरावे असल्यास तिनं ते सादर करावेत. तिच्या आरोपांमध्ये तथ्य अाहे तर तिनं थेट एफआयआर दाखल करावी, असं केसरकरांनी म्हटलं आहे.

एफआयआर दाखल केल्यास चौकशीचे आदेश दिले जातील. कायदा सगळ्यांना सारखाच आहे. नाना दोषी असल्यास त्यांना माफ केलं जाणार नाही, असं केसरकरांनी सांगितलं.

नाना चित्रपटांपेक्षा त्यांच्या समाजकार्यामुळं जास्त प्रसिद्ध आहेत. या प्रकरणामुळं नानांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे, असंही केसरकरांनी म्हटलं आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5