आमीर खानसोबत सोनाक्षी सिन्हा झळकणार ‘ह्या’ सिनेमात

आमीर खानसोबत सोनाक्षी सिन्हा झळकणार 'ह्या' सिनेमात | sonakshi sinha will be seen movie aamir khan

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमीर खान व दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा लवकरच एकत्र झळकणार आहेत. ते दोघे पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहेत.

डीएनएच्या रिपोर्टनुसार, ‘मुघल’ सिनेमात आमीर खान सोबत महत्त्वाच्या भूमिकेत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला घेतले आहे. मीटू मोहिमेअंतर्गत दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आल्यामुळे आमीर खानने मुघल चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता या सिनेमाचे पुढे काय होणार, असा प्रश्न रसिकांना पडला होता. मात्र या चित्रपटाची निर्मिती करणारी कंपनी टीसीरिजने या सिनेमातून सुभाष कपूर यांना हटविले असून ते दुसऱ्या दिग्दर्शकाच्या शोधात आहेत. त्याचबरोबर ते इतर कलाकारांची निवड करत आहेत.
डीएनएच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटात आमीर खानसोबत महत्त्वाच्या रोलसाठी सोनाक्षी सिन्हाला साइन केले आहे. संजय दत्त बायोपिकसारखे ‘मुघल’मध्ये दोन-तीन अभिनेत्री दिसणार आहेत. त्यातील एका महत्त्वाच्या भूमिकेत अभिनेत्री सोनाक्षी दिसणार आहे.
सोनाक्षी सिन्हाच्या भूमिकेबद्दल बोलले जात आहे की, हा जास्त मोठा रोल नसणार आहे. पण, महत्त्वाचा असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सोनाक्षीला या सिनेमाची स्क्रीप्ट खूप आवडली असून तिने या चित्रपटात काम करण्यास होकारही दिला आहे. आमीर व सोनाक्षीला एकत्र स्क्रीनवर पाहणे कमालीचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here