Skip to content Skip to footer

राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ चीनमध्ये सुपरहिट

राणी मुखर्जीचा हिचकी चित्रपट भारतात प्रेक्षकांना फार आवडला नाही. हा चित्रपट भारतात 23 मार्च 2018 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात 76 कोटींची कमाई केली होती.

मात्र चीनी बॉक्स ऑफिसवर 12 ऑक्टोंबरला राणी मुखर्जीचा हिचकी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे ‘हिचकी’ हा चित्रपट भारतापेक्षा चीनमध्ये लोकांच्या जास्त पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने चीनच्या बॉक्स ऑफिसवर 103 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट आता रशियन भाषेत डब करण्यात आला असून रशियातही प्रदर्शित होणार आहे.

Leave a comment

0.0/5