Skip to content Skip to footer

पतीला दूध पाजून नववधू कपडे व दागिने घेऊन पसार

लग्न ही सगळ्यांच्याच आयुष्यातील सुखद घटना. पण हरयाणातील यमुनानगर मध्ये राहणाऱ्या राहुल या तरुणाने मात्र लग्नाचा धसका घेतला आहे. लग्नाच्या 22 व्या दिवशी पत्नीने त्याला दूधातून गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर त्याचे कपडे व घरातील दागिने घेऊन तिने पोबारा केला. राहुल दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीत आल्यावर ही घटना उघडकीस आली आहे.

तीन महिन्यांपूर्वी राहुलचे लग्न शेजारच्या गावातील एका तरुणीबरोबर मोठ्या धूमधडाक्यात झाले. नवीन आयुष्याला सुरुवात झाल्याने राहुलही भलताच खुश होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीने त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालण्यास सुरुवात केली. तिचे हे विचित्र वागणे बघून राहुल व त्याच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. त्यांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या वागण्यात काहीही फरक पडला नाही. अखेर लग्नाच्या 22 व्या दिवशी रात्री पत्नीने राहुलला एक ग्लास दूध पिण्यास दिले.

दूध प्यायल्यानंतर राहुलचे डोके गरगरायला लागले व तो खाली कोसळला. त्यानंतर पत्नीने त्याच्या अंगावरचे कपडे आणि लग्नातील दागिने बॅगेत भरले व घरातून पळ काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर येताच राहुलने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

Leave a comment

0.0/5