भोपाळ: मध्य प्रदेशात 28 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर देखील प्रचाराची धूम सुरू आहे. सध्या एक व्हिडीओ मध्य प्रदेशात धुमाकूळ घालत असून त्यामध्ये काँग्रेसचे नेते कमलनाथ हे ‘बाहुबली’ च्या रुपात लोकांचं भलं करताना दाखवले असून मुख्यमंत्री शिवराज सिंह हे भल्लालदेव असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
या व्हिडीओमध्ये देवसेनाच्या रुपात एक मध्यप्रदेशची महिला भल्लालदेव (शिवराज) यांना दु:ख सांगत आहे. ती म्हणते की महिलांसाठी मध्य प्रदेश असुरक्षित आहे, कायदे व्यवस्था लाचार झाली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून तुम्ही दूक व्हा आणि तुमच्या कायदा व्यवस्थेला सुळावर चढवा. त्याचवेळी बाहुबली (कमलनाथ) यांची एन्ट्री होते ज्याला पाहून जनता खूश होते. त्यांनतर बाहुबली (कमलनाथ) निर्णय देत त्या आरोपीचा गळा कापून टाकतो.
पहा व्हिडिओ:
Creativity in overdrive ahead of the Madhya Pradesh elections. Here’s one which posits @ChouhanShivraj as MP Ka Bahubali. pic.twitter.com/ITXLgbuBVA
— सनातन (@amarbansal241) August 31, 2018
याआधी शिवराज होते बाहुबली
याआधी शिवराज सिंह हे बाहुबलीच्या रुपात दाखवण्यात आले होते. तर काँग्रेसच्या ज्योतिरादित्य सिंधिया यांना भल्लालदेव म्हणून दाखवण्यात आले होते.