Skip to content Skip to footer

रिंकु राजगुरू च्या ग्लॅमरस लुकची होतेय चर्चा, SEE PICS

एखादा फोटो अपलोड व्हावा आणि त्या फोटोची चर्चा काही वेळेतच रंगावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोशल मीडिया. असाच एक फोटो सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तो फोटो आहे आर्ची अर्थात रिंकु राजगुरू चा. या फोटोत तिचा कमालिचा मेकओव्हर झाल्याचे तुमच्या लक्षात येईल.

https://www.instagram.com/p/Bo7QRkwF-n0/?utm_source=ig_web_copy_link

सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरु तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग,तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली. सैराटमुळे तरुणाई जणू काही आर्ची नावाचा जप करु लागली. या सिनेमाने आर्ची अर्थात रिंकू राजगुरुचं संपूर्ण आयुष्यच पालटलं. सैराटमध्ये ग्रामीण भागातली तरुणी साकारणाऱ्या रिंकूचा आता फुलऑन मेकओव्हर झाला आहे. सैराट रिलीज होण्याआधीची रिंकू आणि आत्ताची रिंकू यांत बराच फरक पाहायला मिळेल.

https://www.instagram.com/p/Bo8ra1mljIW/?utm_source=ig_web_copy_link

गावरान अंदाजातील रिंकूचा जणू काही कायापालट झाल्याचे तुम्हाला तिच्या जुन्या आणि आताच्या फोटोवरुन सहज कळेल. रिंकुचे अनेक नवीन फोटो सोशल मीडियावर पाहायल्यावर तुमच्या लक्षात येईल की तिने तिचे वजन ही कमी केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून रिंकु आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येत आहे. सध्या नवनवीन अंदाजातले ग्लॅमरस फोटो रिंकु सोशल मीडियावर शेअर करत असून तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून खूप सारे लाईक्स आणि कमेंटस पाहायला मिळत आहे.

आर्चीची एक अशी गोष्ट आहे जी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा बसेल धक्का !

बालपणी अकलूजमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये रिंकूने सहभाग घेतला. यांत गाणी किंवा नृत्याच्या कार्यक्रमाचा समावेश होता. मात्र आजवर रिंकूने कोणतंही नाटक पाहिलेलं नाही. अकलूजमध्ये कोणत्याही नाटकाच्या स्पर्धा किंवा नाटकांचं आयोजन करण्यात आलं नसल्याने ती नाटकांपासून आजवर दूरच आहे. त्यामुळेच की काय तिने नाटकात कधी सहभाग घेतला नाही किंवा नाटक पाहिलंही नाही. मात्र आता एक कलाकार म्हणून नाटक पाहण्याची रिंकूची इच्छा आहे. नाटक हा प्रकार जाणून घेण्याची तिला उत्सुकता आहे. लवकरच मराठी नाटक पाहण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे.

Leave a comment

0.0/5