जाणून घ्या कशी सुरुवात झाली ‘व्हॅलेंटाईन डे’ ची

जाणून घ्या कशी सुरुवात झाली ‘व्हॅलेंटाईन डे’ ची | origin of valentine's day

14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन आठवडा अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. पाश्चात्य देशात हा दिवस मोठ्या उसत्ह साजरा केला जातो.

चीनमध्ये ‘नाइट्स ऑफ सेवेन्स’ प्रेमी जोडप्यासाठी हा दिवस खास असतो, तर जपान आणि कोरियामध्ये हा दिवस ‘वाइट डे’ म्हणून ओळखला जातो. एवढेच नाही तर, या देशांत लोक महिनाभर एकमेकांना भेटवस्तू आणि फुले देऊन त्यांच्या भावना व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन डे ची सुरूवात कशी झाली हे जाणून घेऊयात….

valentine-day2

आठशे वर्षांपूर्वी रोम राज्यात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात झाली. प्रेम व्यक्त करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असे मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्‍यांचाही त्याला राग येत असे. संत व्हॅलेंटाईनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने वेलेंटाईनला तुरुंगात कैद केले.

valentine-day3

तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाईनचे जेलरच्या आंधळ्या मुलीवर प्रेम बसले. त्याच्या प्रेमाच्या शक्तीने त्या मुलीचे अंधत्व नाहीसे झाले, असे सांगितले जाते. इसवी सन 269 च्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनने प्रेम केले म्हणुन शिक्षा देण्यात आली. व्हॅलेंटाईनला या दिवशी फाशी देण्यात आली. व्हॅलेंटाईनने प्रेयसीला एक पत्र लिहिले होते. या पत्रात ‘यूवर व्हॅलेंटाईन, तुझा चाहता’ असे लिहिले होते. तेव्हापासून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनच्या स्मरणानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.

7 फेब्रुवारी रोझ डे
7 फेब्रुवारी म्हणजेच रोझ डेपासून या व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होते. या दिवशी आपल्या जोडीदाराला गुलाबाचे फुल देऊन प्रेम व्यक्त करतात.

valentine-day4

8 फेब्रुवारी प्रपोज डे
यादिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला गिफ्ट घेऊन प्रपोज केले जाते.

valentine-day5

9 फेब्रुवारी चॉकलेट डे
आपल्या आवडत्या व्यक्तीला खास चॉकलेट देऊ शकतो.

valentine-day6

10 फेब्रुवारी टेडी डे
टेडी डे यादिवशी एकमेकांना टेडी गिफ्ट दिले जातात. मुलींना टेडी बिअर आवडतात, या दिवशी टेडी बिअर देऊ आपले प्रेम व्यक्त करु शकतात.

valentine-day7

11 फेब्रुवारी प्रॉमिस डे
प्रॉमिस डे यादिवशी प्रेमिजोडपी एकमेकांना नेहमी साथ देण्याचे प्रॉमिस करतात

valentine-day8

12 फेब्रुवारी ‘हग डे’
‘हग डे’ म्हणजेच आलिंगन दिवस. या दिवशी एकमेकांना मिठी मारुन शुभेच्छा देण्यात येतात.

valentine-day9

13 फेब्रुवारी किस डे
यादिवशी प्रिय व्यक्तीचे किस म्हणजेच चुंबन घेऊन आपल्या भावना व्यक्त करु शकतो.

valentine-day10

14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे
व्हॅलेंटाईन डे हा संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणासाठी साजरा केला जातो. प्रेमि जोडप्यांसाठी हा दिवस फार महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी आपल्या जवळच्या व्यक्तीला गिफ्ट देण्यात येते.

valentine-day11

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here