..म्हणून सोशल मीडियावर सोनम कपूरने बदललं स्वत:च नाव

म्हणून सोशल मीडियावर सोनम कपूरने बदललं स्वत:च नाव|Sonam Kapoor changed his own name on social media

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड स्टाईल आयकॉन अभिनेत्री सोनम कपूर अचानक चर्चेत आली होती. सोमन कपूरने लग्नानंतर सोशल मीडियावर तिचं नाव बदलल्याने चर्चा होती. सोनम के अहूजाने सोशल मीडियावर जोया सिंह सोलंकी नाव बदलून सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं होतं. पण आता या नावामागचा उलगडा झाला आहे. सोनम कपूरचा आगामी ‘द जोया फॅक्टर’ चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

‘द जोया फॅक्टर’ चित्रपटातून सोनम कपूर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने या चित्रपटाच्या फर्स्टलूकसह चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. ‘द जोया फॅक्टर’च्या फर्स्टलूक पोस्टरमध्ये सोनम कपूर आणि दलकीर सलमान एका पुस्तकामागे लपलेले दिसत आहेत. सोनम कपूर जोया सिंह सोलंकी ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता दलकीर सलमानही प्रमुख भूमिकेत असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here