Skip to content Skip to footer

‘रात्रीस खेळ चाले 2’ची शंभरी पूर्ण

छोट्या पडद्यावरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचवली असून, नेमके होणार तरी काय मालिकेच्या पुढच्या भागात याचेच कुतूहल अनेकांमध्ये पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद मालिकेच्या पहिल्या पर्वाला दिला तसाच प्रेमाचा वर्षाव या मालिकेच्या दुसऱ्या भागावर देखील प्रेक्षक करत आहेत. मालिकेतील कलाकारांनाही याचे बहुतांश श्रेय हे जाते.

 

नुकतेच या मालिकेने १०० भागांचा पल्ला गाठला आहे. संपूर्ण टीमने सेटवर केक कापून या यशस्वी शतकाचा आनंद साजरा केला. यावेळी सेटवर रात्रीस खेळ चाले २ मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. जिच्यामुळे हि मालिका यशस्वीरित्या १०० भाग पूर्ण करू शकली त्यांचे संपूर्ण टीमने आभार मानले. सेटवर केक कापून आनंद साजरा केला आणि या यशाच्यामागे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो भरवला. कलाकारांनी सांगीतले की कार्यक्रमाविषयी आणि त्यातील लाडक्या पात्रांसाठी चाहत्यांकडून त्यांना नेहमीच सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Leave a comment

0.0/5