Skip to content Skip to footer

दिशा वाकानीने शेअर केला मुलीचा फोटो. पाहा किती क्यूट आहे तिची मुलगी

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आता प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत आणि त्यातही या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेमुळे दिशा वाकानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

दिशा तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत कधी परतणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. दिशा मालिकेत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती इन्स्टाग्रामवर तिचे फोटो पोस्ट करत असते. त्याचसोबत ती सोशल नेटवर्किंग साईटद्वारे तिच्या फॅन्सशी गप्पा देखील मारते. तिने आता नुकताच तिच्या मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. दिशाच्या मुलीचे नाव स्तुती असून या पोस्टमध्ये ती दोन-तीन महिन्यांची असतानाचा आणि आताचा असे दोन फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे. तिची मुलगी खूपच क्यूट असल्याचे सोशल मीडियाद्वारे लोक तिला सांगत आहेत.

 

दिशा वाकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब आहे. दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. पण तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून गेल्या कित्येक महिन्यांपासून दूर आहे. प्रेक्षकांची लाडकी दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी मालिकेत केव्हा परतेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

 

Leave a comment

0.0/5