छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री दिगांगना सूर्यवशी तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यासाठीही ओळखली जाते. याच सौंदर्याच्या जोरावर दिगांगनाला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. ‘जलेबी’ या चित्रपटातून तिचा बॉलिवूड डेब्यू झाला. चित्रपटातील तिच्या शानदार अभिनयासाठी तिला दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. सध्या ही दिगांगना तेलगू चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाचे नाव ‘हिप्पी’. याच चित्रपटाच्या निमित्ताने दिगांगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय,‘ हिप्पी’च्या शूटिंगसाठी श्रीलंकेत असलेच्या दिगांगनाला अजगरासोबत फोटोशूट करणे महागात पडले. अजगराच्या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली.
तुमच्या वाटेत साप किंवा तत्सम प्राणी येणे हे श्रीलंकेत खूप सामान्य मानले जाते. अशातच एक गारुडी दिगांगनाच्या सिनेमाच्या सेटवर पोहचला. त्याच्याजवळच्या अजगरासोबत फोटो काढण्याचा मोह दिगांगनाला आवरता आला नाही. मग काय, या अजगराला गळ्यात घालत तिने अनेक फोटो क्लिक केलेत. पण याच दरम्यान या अजगराने दिगांगनाच्या गळ्याभोवती फास आवळायला सुरुवात केली. दिगांगनाला ते जाणवले आणि तिने धाडस करून अजगराला आपल्या गळ्यातून खेचून बाजूला काढले आणि मोठी दुर्घटना टळली.
अलीकडे ‘हिप्पी’चा ट्रेलर प्रदर्शित झााला. या ट्रेलरमध्ये दिगांगना सेक्सी अवतारात दिसली. ‘हिप्पी’ हा चित्रपट एन कृष्णा दिग्दर्शित करत आहेत. यात दिगांगना अभिनेता कार्तिकेयसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
टीव्हीच्या दुनियेत दिगांगना प्रचंड यशस्वी राहिली. बालकलाकार म्हणून तिने तिच्या करिअरची सुरूवात केली होती. एकता कपूरच्या ‘क्या हादसा क्या हकिकत’मध्ये ती बालकलाकार म्हणून दिसली होती. यानंतर ‘वीरा’ या मालिकेत मी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली. तिची ही भूमिका चांगलीच गाजली. बिग बॉसमध्येही ती दिसली होती.