एमएस धोनीचा हा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल.

एमएस धोनी | This video of MS Dhoni is going viral.

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आयसीसी विश्वचषक 2019 स्पर्धेनंतर क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. क्रिकेटमधील विश्रांती दरम्यान, धोनी आपल्या कुटुंबियांसह आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याव्यतिरिक्त इतर खेळही खेळताना दिसत आहे. त्यामुळे तो क्रिकेटपासून दूर असला तरी सातत्याने चर्चेत असतो.असा सध्या तो एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. बालदिना निमित्त14 नोव्हेंबरला एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये धोनी एक लहान मुलीला एक पदार्थ खाऊ घालताना दिसत आहे.एमएस धोनी आणि या लहान मुलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांना खूप भावला आहे. तसेच चाहत्यांनी त्याच्या साधेपणाचे कौतुकही केले आहे.हा व्हिडिओ त्या लहान मुलीच्या अन्नप्राशन विधी दरम्यानचा असल्याचे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here