‘भल्लालदेव’ च्या वडिलांच्या घरावर आणि स्टूडिओवर आयकर विभागाचा छापा

भल्लालदेव | Income Tax department raids on Bhallaldev's father's house and studio

बाहुबली चित्रपटातील भल्लालदेव राणा दग्गुबादीचे वडील दग्गुबाती सुरेश बाबू यांच्या घरावर आणि अन्य ठिकाणांवर आयकर विभागाने हैदराबादच्या रामानायडू स्टूडिओवर छापे मारले. बुधवारी सकाळी ही कारवाई सुरू करण्यात आली. ते टॉलिवूडचे निर्मातेही आहेत. आयकर विभागाने हैदराबादच्या त्यांच्या निवासस्थानीही छापा मारल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाकडून झाडाझडती केली जात होती.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून महत्वाची कागदपत्रेही तपासण्यात आली आहेत. काही कागदपत्रे जप्तही करण्यात आली आहेत. निर्माते दग्गुबाती सुरेश बाबू यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.टॉलिवूडचे मोठे निर्माते म्हणून सुरेश बाबू यांची ओळख आहे. ते निर्माते दग्गुबाती रामानायडू यांचे पूत्र आहेत. त्यांनी सुरेश प्रॉडक्शनची सुरूवात केली होती.

आतापर्यंत 150 सिनेमांची निर्मिती यामधून करण्यात आली आहे. या प्रॉडक्शन हाऊसचे आंध्रप्रदेश आणि तेलंगानामध्ये काही थिएटरही आहेत. आयकर विभागाचा छापा पडला तेव्हा सुरेश बाबू देशात नव्हते. अन्य निर्मात्यांचे प्रॉडक्शन हाऊसही आयकर विभागाच्या रडारवर आहेत. या यादीमध्ये नॅचरल स्टार नानी, हरिका हसाईन क्रिएशन्स, सितारा एंटरटेन्मेंट यांची नावे आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here