.आणि रणवीर दीपिकाला म्हणाला, ‘मला मारून टाक’ !

रणवीर | And Ranveer said to Deepika, 'Kill me!'

बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांची जोडी बॉक्स ऑफिसवर जेवढी लोकप्रिय आहे तेवढीच रिअल लाइफमध्येही चाहत्यांमध्ये लोकप्रिय असल्याचं पाहायला मिळतं. लग्नानंतर दोघांचीही रोमॅन्टीक केमेस्ट्री सोशल मीडियावर पाहायला मिळते. दीपिकाच्या फोटोंवर चाहते घायळ होत असतात. यावेळीही असंच काहीसं झालं आहे. तिचा हेअरकट हा चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

नव्या हेअरकटमधील फोटो दीपिकाने तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केला त्यावर पती रणवीर सिंहने रिल्पाय दिला आहे.दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांकडून तुफान लाईक्स आणि कमेंटस येत आहेत. तिच्या नव्या हेअरस्टाइला चाहत्यांनी पसंती दिली आहे. तिच्या या नव्या लूकवर चाहते पुरते घायाळ झाले आहेत.

दीपिकाच्या नव्या हेअरकटवर पती रणवीरने ‘मार दो मुझे’ अशी कमेंट केली आहे. सोशल मीडियावर दीपिका आणि रणवीरची केमिस्ट्री काय रंगताना चाहत्यांना पाहायला मिळते. रणवीरसह बॉलिवूडमधील इतर कलाकरांनीही दीपिकाच्या या नव्या हेअरस्टाइलवर कमेंट केली आहे. ओएमजी…ब्युटी ! अशी कमेंट बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here