अंडरवर्ल्डच्या डॉनशी भिडली होती प्रीती झिंटा, धमक्यांना न घाबरता कोर्टात दिली साक्ष

अंडरवर्ल्डच्या-डॉनशी-भिड-Underworld-don's-vid

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिचा आज वाढदिवस प्रीतीनं तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये अनेक हिट सिनेमा दिले आहेत. पण एक वादग्रस्त म्हणा किंवा प्रीतीच्या साहसाचा किस्सा म्हणा आजही सर्वांच्या लक्षात आहे. हा किस्सा तेव्हाचा आहे. जेव्हा प्रीतीनं अंडरवर्ल्डच्या डॉनशी टक्कर घेत त्याच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती. हा किस्सा घडला होता तो 2001 मध्ये रिलीज झालेल्या ‘चोरी-चोरी, चुपके-चुपके’ सिनेमापासून.

सूत्रांच्या माहितीनुसार अब्बास मस्तान ‘चोरी-चोरी, चुपके-चुपके’ या सिनेमाचं दिग्दर्शन करत होते. या सिनेमात प्रीति झिंटा, रानी मुखर्जी आणि सलमान खान प्रमुख भूमिकेत होते. कागदोपत्री या सिनेमाची निर्मिती हिरा व्यापारी भरत शाह आणि प्रोड्युसर नाजिम रिजवी करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र या सिनेमाच्या निर्मितीसाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा पैसा लागला होता.

याबाबत सलमान खान, शाहरुख खान, राकेश रोशन यांसारख्या व्यक्तींनी काही बोलण्यास नकार दिला होता. प्रीतीनं मात्र छोटा शकीलच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती. प्रीतीनं आपल्याला वारंवार धमक्यांचे फोन येत असल्याचं साक्ष दिली होती. कोर्टानं प्रीतीला याबाबत साक्ष देण्यासाठी बोलवलं होतं. हे प्रकरण अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं असल्यानं प्रीतीची साक्ष रेकॉर्ड करण्यात आली आणि त्यानुसार भरत शाहला अटक करण्यात आली होती.

भरत शाह याला सिनेकलाकरांकडून जबरदस्तीन वसूली करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. यासोबतच निर्माता नजीम रिझवी यालाही दोषी ठरवण्यात आलं. शाह याच्यावर भारतीय दंडविधान कलम 118 नुसार केस चालवण्यात आली. तर नजीम रिझवीचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले. प्रीतीनं दाखवलेल्या धाडसानं संपूर्ण सिने इंडस्ट्रीला हलवून टाकलं.

दिलेल्या एका मुलाखतीत प्रीती या प्रकरणावर बिनधास्त बोलली. ती म्हणाली, ‘एक वेळ अशी होती की मला अंडरवर्ल्ड कडून धमक्यांचे फोन येत होते. त्यावेळी मी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. पण जर मला माहित असतं की अंडरवर्ल्डला घाबरुन कोणीच बोलण्यासाठी पुढे येणार नाही तर मी घाबरुन कधीच यावर बोलले नसते.’

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here