“… तर मी चित्रपटात टॉपलेस सीन देईन”

तर-मी-चित्रपटात-टॉपलेस-If-I-movie-topless

मंदना करीमी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. चित्रपटांमधील मादक दृश्यांमुळे ती जास्त चर्चेत असते. परंतु अशा प्रकारे चर्चेत राहणं स्वत: मंदनाला देखील खूप आवडतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने अशा प्रकारच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड लाईफसोबत केलेल्या लाईव्ह चॅटमध्ये मंदना म्हणाली, “मला अनेकदा चित्रपटांमधील मादक दृश्यांबाबत विचारलं जातं. परंतु अशी दृश्य मी स्वेच्छेने देते. जर चित्रपटाच्या कथानकाची गरज असेल तर एखादा टॉपलेस सीन किंवा किंसिंग सीन करायला माझी काहीच हरकत नाही. कारण तो माझ्या कामाचा एक भाग आहे असं मला वाटत. परंतु त्या टॉपलेस सीनला काही तरी अर्थ असायला हवा. त्या दृश्यामुळे चित्रपटात काही तरी घडामोड व्हायला हवी. असं होणार नसेल तर मात्र मी नकार देते. परंतु अशा दृश्यांमुळे चर्चेत राहणं मला आवडंत.

‘क्या कूल है हम’ या चित्रपटातून मंदनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘भाग जॉनी’, ‘रॉय’, ‘मै और चाल्स’ अशा काही चित्रपटांमध्ये काम केले. परंतु तिला खरी प्रसिद्धी मिळाली सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या शोमुळे. या शोमुळे ती रातोरात लोकप्रिय झाली. यानंतर तिने ‘क्या कूल है हम – ३’ या चित्रपटात देखील काम केले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here