Skip to content Skip to footer

वापरलेले कंडोम धुवून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांनी कंपनी केली सील

कंपनीत सापडले तीन लाख कंडोम

अनेकदा आपण भंगार वेचणारे, भंगारातून मिळणाऱ्या वस्तूंची विक्री करणाऱ्यांबाबत ऐकलं असेल. पण नुकतीच एक धक्कादायक आणि किळसवाणी घटना घटना समोर आली आहे. वापरलेले कंडोम केवळ धुवून ते नव्या रूपात विक्रीसाठी आणले जात असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हा प्रकार समोर आला असून त्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

व्हिएतनाममधील स्थानिक प्रसारमाध्यमानं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी एका कंपनीवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना त्या कंपनीत वापरलेले तब्बल ३ लाख २० हजार कंडोम सापडले. त्यानंतर पोलिसांनी ही कंपनी सील केली. बिन डाँग प्रांतातील हो मिन्ह सिटीजवळील एका कंपनीत हा संपूर्ण प्रकार सुरू होता.

यामध्ये एका टोळीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ही टोळी रस्त्यावर पडलेले वापरलेले कंडोम गोळा करून ते धुवून त्यांना नव्या पॅकमध्ये सील करत. त्यानंतर ते कंडोमचे पॅकेट पुन्हा मार्केटमध्ये विक्रीला उपलब्ध करून दिले जात असत. हे कंडोम गरम पाण्यात टाकून धुतले जात होते. त्यानंतर मशीनच्या सहाय्यानं ते सुकवण्यात येत आणि नंतर ते पुन्हा पॅक केले जात होते. अशा प्रकारे हजारो कंडोमची विक्री करण्यात आल्याची कबुलीही कंपनीच्या मालकाकडून देण्यात आली.

Leave a comment

0.0/5