हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारने ट्विट करत चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. आता हा चित्रपट परदेशातही प्रदर्शित होणार आहे.
‘फॉक्स स्टार हिंदी’ने ट्विट करत अक्षय कुमाराचा आगमी चित्रपट परदेशात प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. ‘येत्या दिवाळीमध्ये लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या दिवशी हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएई या देशात ही प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्सने केले असून चित्रपटात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.’
९ नोव्हेंबर रोजी अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएई या देशातील काही ठराविक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टावर पाहता येणार आहे. तसेच अमेरिका आणि कॅनडामधील प्रेक्षकांसाठी हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे.