टीव्ही शोमध्ये जाणं तुम्ही का टाळता?; रेखा म्हणाल्या, “मी काही दाखवायची वस्तू…”

टीव्ही-शोमध्ये-जाणं-तुम्-Going-to-you-in-a-TV-show
ads

सिनेसृष्टीतील अनेक कलाकार चर्चेत राहण्यासाठी विविध प्रकारच्या टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावताना दिसतात. या शोमध्ये जाऊन ते आपल्या आयुष्यातील काही गंमतीशीर किस्से सांगून प्रसिद्धी मिळवतात. परंतु अभिनेत्री रेखा मात्र त्याला अपवाद आहे. त्या रिअ‍ॅलिटी शोंमध्ये जाणं टाळतात. अलिकडेच त्यांनी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी रिअ‍ॅलिटी शोंमध्ये न जाण्याचं कारण त्यांनी सांगितलं.

 

कपिल आपल्या अनोख्या शैलीत रेखा यांना सवाल केला, तुम्ही इतर कलाकारांप्रमाणे टीव्ही शोमध्ये का जात नाही? यामागे काही खास कारण आहे का? यावर रेखा म्हणाल्या, मी काही दाखवायची वस्तू आहे का? लोकांनी मला बघायला. त्यावर कपिल म्हणाला असं असेल तर आम्हा सर्वांना अंदमान-निकोबार बेटांवरच पाठवायला पाहिजे. दोघांच्या या गंमतीशीर जुगलबंदीचा व्हिडीओ कपिलने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here