Skip to content Skip to footer

अभिनेत्रीने आत्महत्या करण्याच्या १२ तास आधी केली होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट

जाणून घ्या काय होती तिची शेवटची पोस्ट…

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री व्ही. जे. चित्राने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चित्राने चेन्नईतील एका हॉटेलमध्ये गळफास घेतला. वयाच्या २८व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आत्महत्या करण्याच्या काही तासांपूर्वी चित्राने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट तिची अखेरची पोस्ट ठरली आहे.

आत्महत्या करण्याच्या १२ तास आधी चित्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली होती. स्टोरीमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आनंदी असल्याचे दिसत आहे. तसेच ती फोनवर देखील बोलताना दिसत आहे. फोटो पाहता चित्राने इतके टोकाचे पाऊल का उचलले असेल असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

चित्रा रात्री २.३० वाजता चित्रीकरण संपवून हॉटेलवर परतली होती. हॉटेलमध्ये ती होणारा पती प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवीसोबत राहत होती. चित्रा फ्रेश होण्यासाठी गेली होती. पण बराच वेळ ती दरवाजा उघत नसल्यामुळे हेमंतने हॉटेल स्टाफला बोलावले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी चित्राने आत्महत्या केल्याचे समोर आले.

‘पांडियन स्टोर्स’ या मालिकेतील चित्राची भूमिका विशेष गाजली होती. या मालिकेत तिने मुलई ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे चित्रा प्रकाशझोतात आली होती. त्यांमुळे तिच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

Leave a comment

0.0/5