कोरोनाच्या संकटात मराठी चित्रपट सृष्टीला ४०० कोटींचा फटका

कोरोनाच्या संकटात मराठी चित्र-Marathi picture in the crisis of Corona
कोरोनाच्या संकटात मराठी चित्रपट सृष्टीला ४०० कोटींचा फटका

कोरोनाच्या काळात मार्च महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन जाहीर झाला होता. या लॉकडाऊनचा फटका मराठी चित्रपट सृष्टीला तसेच मराठी मालिकांना सुद्धा बसला होता. अनेक चित्रपटाच्या शुटिंग कोरोना काळात थांबवण्यात आल्या होत्या. तसेच अनेक नवीन चित्रपटाचे प्रोजेक्ट कोरोना काळात थांबवण्यात आले होते. त्यामुळे चित्रपट सृष्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

कोरोनाच्या संकटात मराठी चित्र-Marathi picture in the crisis of Corona

यावर नितीन वैद्य यांनी २००५ ते २०१५ या वर्षातील आढावा घेतला आहे. त्यानुसार, १० वर्षांमध्ये कलाविश्वाला एकंदरीत किती कोटींचा आर्थिक फटका बसला हे त्यांनी फेसबुकच्या माद्यमातून सांगितले आहे.

नितीन वैद्य यांनी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत कलाविश्वातील आर्थिक उलाढालींचा एकंदरीत अंदाज घेतला आहे. त्यानुसार, गेल्या दशकभरात मराठी कलाविश्वाला जवळपास ४०० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला. या पोस्टसोबतच त्यांनी आकडीवारी स्पष्ट करणारा एक तक्ता देखील शेअर केला आहे .

ही पोस्ट शेअर करत त्यांनी कलाविश्वाचं सध्याचं स्वरुप, या क्षेत्रापुढे उभा असलेल्या अडचणी, त्यावरील उपाय सांगितले आहेत. सोबतच सरकारकडून कोणत्या मदतीची अपेक्षा आहे हेदेखील सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here