‘दृश्यम २’ हिट ठरताच दिग्दर्शकानं दिलं चाहत्यांना एक सरप्राईज, जाणून घ्या

महाराष्ट्र बुलेटिन : ‘दृश्यम २’ हा चित्रपट सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रेक्षक, समीक्षक अशा सर्वांच्याच पसंतीला हा चित्रपट उतरत आहे. विशेष म्हणजे ‘दृश्यम २’ ची कथा पहिल्या ‘दृश्यम’ चित्रपटाच्या कथेलाच पुढे नेताना दिसून येते. दरम्यान ही कथा आता पूर्णत्वास घेऊन जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक करणाऱ्या जितू जोसेफने एक घोषणा केली आहे.

दिग्दर्शकाच्या मनात आता ‘दृश्यम’ चे रहस्य सोडवण्याचा विचार खोळंबत आहे. त्यामुळे दिग्दर्शक जितू यांनी एक घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की प्रेक्षकांना लवकरच ‘दृश्यम ३’ बघायला मिळणार आहे. ‘दृश्यम २’ ची कथा ‘दृश्यम ३’ पुढे घेऊन जाणार असून या चित्रपटाचा हा शेवटचा भाग असेल. विशेष म्हणजे या शेवटच्या भागात सगळी रहस्य उलगडणार आहेत. तसेच या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल त्यांनी स्पष्ट केले की, स्क्रिप्टमध्ये अजून काही बदल करायचा आहे, त्यामुळे हा भाग आता लगेचच प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकत नाही.

दरम्यान ‘दृश्यम २’ विषयी बघितले तर अभिनेते मोहनलाल यांच्या मुख्य भूमिकेत असणारा हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय. विशेष म्हणजे याचा पहिला भाग ही प्रेक्षकांना खूप आवडला होता. सगळीकडे त्याची चर्चा झाली होती. पहिल्या भागाचा हिंदीमध्येही रिमेक आला होता, ज्यामध्ये अजय देवगणने मुख्य भूमिका साकारली होती आणि या चित्रपटाचे प्रेक्षकांनीही खूप कौतुक केले होते. दरम्यान ‘दृश्यम २’ देखील हिंदीत येणार आहे, असे वृत्त समोर आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here