अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’ चित्रपटासाठी अ‍ॅमेझॉन प्राइम पहिल्यांदाच बनणार प्रोड्युसर

महाराष्ट्र बुलेटिन : अक्षय कुमारचा ‘राम सेतु’ हा चित्रपट अनेक प्रकारे विशेष चित्रपट ठरणार आहे. अक्षयच्या प्रॉडक्शन हाऊसच्या केप ऑफ गुड फिल्म्स, अ‍ॅबॅंडिएन्ट एंटरटेनमेंट, लायका प्रॉडक्शन सोबतच आता अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video) ‘राम सेतु’ ला को-प्रोड्युस करणार आहे. ‘राम सेतु’ मार्फत अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ पहिल्यांदा भारतात चित्रपट निर्मितीत प्रवेश करत आहे. म्हणजेच अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ हा भारताचा पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म असेल, जो सिनेमा हॉलमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा निर्माता म्हणून उदयास आला आहे.

‘राम सेतु’ मध्ये अक्षय कुमारसोबत जॅकलिन फर्नांडिज आणि नुशरत भरूचा मुख्य भूमिका साकारणार असून अभिषेक शर्मा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. अभिषेक शर्मा (परमाणु, तेरे बिन लादेन फेम) द्वारे दिग्दर्शित आणि डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी (पृथ्वीराज चौहान फेम) द्वारे रचनात्मकपणे निर्मित केलेला हा चित्रपट एक अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर ड्रामा आहे, ज्याची कहाणी भारतीय सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसामध्ये खोलवर रुजलेली आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ‘राम सेतु’ प्राइम मेम्बर्ससाठी लवकरच भारत आणि २४० हून अधिक देशांत व प्रदेशांत उपलब्ध होईल.

आपल्या चित्रपटामध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या जोडण्याबद्दल अक्षय कुमारने म्हटले की, “राम सेतूची कहाणी अशा विषयांपैकी एक आहे ज्याने मला नेहमीच प्रेरणा दिली आणि माझ्या मनात कुतूहल निर्माण केले आहे. ही कथा शक्ती, शौर्य आणि प्रेमाचे प्रतिनिधित्व करते आणि त्या विशिष्ट भारतीय मूल्यांना प्रस्तुत करते, ज्याने आपल्या महान देशाची नैतिक आणि सामाजिक रचना घडविली आहे. राम सेतू हा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळातील पिढ्यांमधील एक पूल आहे. मी भारतीय वारशाची एक महत्त्वाची कहाणी सांगण्यासाठी खूप उत्सुक आहे, विशेषत: तरुणांनी ही कहाणी ऐकायला हवी. मला आनंद आहे की ही कहाणी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओद्वारे जगातील सर्व भौगोलिक प्रदेशांपर्यंत पोहोचेल आणि जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकेल.”

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ इंडियाचे कंटेंट हेड आणि डायरेक्टर विजय सुब्रमण्यम म्हणाले, “अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओमध्ये आमचा प्रत्येक निर्णय प्रथम-ग्राहक या दृष्टीकोनातून होत असतो. भारतीय मातृभूमीत जन्म घेतलेल्या कथांना केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षक मोठ्या संख्येने पाहतात आणि भारतीय परंपरा उघडकीस आणणार्‍या चित्रपटाच्या निमित्ताने सह-निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यास आम्हाला आनंद होत आहे. विक्रम मल्होत्रा ​​आणि अ‍ॅबॅंडिएन्ट एंटरटेनमेंट तसेच अक्षय कुमार यांच्यासोबत झालेला आमचा प्रवास आतापर्यंत बेमिसाल आणि अत्यंत यशस्वी ठरला आहे. या चरणातून आम्ही आपसी सहकार्य आणखी मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आम्ही इतिहासाच्या एका अद्वितीय कथेच्या जोरावर जगाच्या कानाकोपऱ्यात उपस्थित असलेल्या आमच्या ग्राहकांचे मनोरंजन करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू ठेवत आहोत. अधिक माहिती म्हणजे अक्षय कुमारने अलीकडेच अयोध्येत ‘राम सेतु’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here