Cheating case सोनाक्षी सिन्हाला हाय कोर्टाचा दिलासा, तुर्तास अटक टळली पण.

Cheating case सोनाक्षी सिन्हाला हाय कोर्टाचा दिलासा, तुर्तास अटक टळली पण. |cheating-case- Sonakshi-Sinhaala-hi-ka

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला इलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये सोनाक्षीची अटक रोखली आहे.

सोनाक्षी सिन्हासह टॅलेंट फुलऑन कंपनीचा अभिषेक सिन्हा, मालविका पंजाबी, धुमिल ठक्कर आणि एडगर सकारिय यांच्याविरोधात 22 फेब्रुवारी 2019 ला काटघर पोलीस स्थानकामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार प्रमोश शर्माने आरोप केला होता की, सोनाक्षी सिन्हाने 37 लाख रुपयांच्या बोलीवर 30 सप्टेंबर, 2018 ला होणाऱ्या एका कार्यक्रमात येण्याचे कबुल केले होते. परंतु सोनाक्षीने शेवटच्या क्षणाला येण्यास नकार दिला व यामुळे आपल्या मोठा आर्थिक फटला बसला.

दरम्यान, पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर सोनाक्षीचे वकील इम्रान उल्लाह आणि खालिदने उच्च न्यायालयात धाव घेत एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. या याचिकवर सयावर सुनावणी करताना न्यायमूर्ती नहीद अरा मोनीस आणि विरेंद्र श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने एफआयआर रद्द करण्यात नकार दिला, परंतु पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत सोनाक्षीला अटक करू नका असेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे तुर्तास अटक टळल्याने सोनाक्षीला दिलासा मिळाला आहे. परंतु न्यायालय सांगेल त्यावेळी तिला हजर रहावे लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here