ऑफिस आणि पार्टीतही Denim कपड्यांमध्ये असं दिसा स्टायलिश

Denim म्हटलं की पहिलं फक्त जिन्स समोर यायची. मात्र आता डेनिमचं जॅकेट्स, ड्रेस, स्कर्ट, वन पिस सर्व काही उपलब्ध आहेत. त्यामुळे फक्त causal म्हणून वापरले जाणारे Denim चे कपडे आता ऑफिसमध्येही वापरले जातात. डेनिम तुम्ही कुठीही, केव्हाही घालू शकता हेच डेनिमचं वैशिष्ट्य आहे. Denim च्या कपड्यांमध्ये तुम्हाला कम्फर्टही वाटतं आणि तुम्ही स्टायलिशही दिसता.

ऑफिस

ऑफिसमध्ये तुम्ही ब्लू डेनिम पँटवर व्हाईट फॉर्मल शर्ट आणि त्यावर बॉक्स ब्लेजर घाला.

जर ऑफिसमध्ये मीटिंग नसेल, तर शर्टाऐवजी टीशर्ट किंवा एखादं छानसं टॉप आणि त्यावर डेनिम ब्लेजर किंवा डेनिम जॅकेट घालू शकता

तुम्हाला जिन्स पँट आवडत नसेल तर तुम्ही डेनिमचा कुर्ता आणि त्यावर व्हाईट प्लाजो किंवा साधी पँट घालू शकता.

पार्टी मित्रांसोबत पार्टी करताना लाँग शर्ट ड्रेस सुंदर दिसेल. तुम्ही हा वनपीस म्हणून घालू शकता, नाहीतर त्याखाली लेंगिग घालू शकता.

ऑफिसमध्ये पार्टी असेल तर डेनिम जंपसूट घाला. बॉटमला एम्ब्रॉयडरी किंवा लेस वर्क असलेले जंपसूट पार्टीत चांगले दिसतात. बर्थडे पार्टी किंवा एखादं वेडिंग फंक्शन असल्यास डेनिम लेहंगा घालू शकता, त्यावर क्रॉप टॉप घाला.

डिनर पार्टीत तुम्ही क्रॉप टॉप आणि डेनिम साडी नेसू शकता.

प्रवासफिरायला जाताना जिन्स, राऊंट नेक टीशर्ट घाला.

त्यावर डेनिम जॅकेट घालाल तर लूक कम्प्लेट होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here