करोनाचे आव्हान पेलण्यास मुंबई महानगर पालिका सज्ज..

करोनाचे-आव्हान-पेलण्यास-Challenge-to-play

सध्या देशात नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आहे. त्यातच अनेक देशात खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाय-योजना केल्या जात आहे. आता करोना व्हायरसच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली असून, आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्यासाठी कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. चार उपनगरीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष आणि अतिरिक्त खाटांची उपलब्धता ठेवण्यासह आता खासगी रुग्णालयांची मदतही घेण्यात येणार आहे. खासगी, सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयांच्या सहकार्याने एकूण ४०० खाटांची गरज पडल्यास उपलब्धता ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अधिष्ठता यांनी दिलेली आहे.

कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या १३ जणांचे करोनासाठीचे नमुने निगेटिव्ह आले असून, रविवारी चार संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. या चार रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल आज सोमवारी मिळणार आहेत. मुंबईमध्ये अद्याप एकही करोना रुग्ण आढळला नसल्याने कोणीही घाबरू नये, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी केले आहे. राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या १५ जण निरीक्षणाखाली असून, २५८ जणांना स्वगृही सोडण्यात आले आहे. अद्याप एकही संशयित रुग्ण आढळून आला नसून, प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध माध्यमांतून जनप्रबोधन करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here