कोरोना अपडेट : आरोग्य सेवेसाठी आर्थिक निर्बंध उठविले…

कोरोना-अपडेट-आरोग्य-सेवे-Corona-Update-Healthcare

कोरोना अपडेट : आरोग्य सेवेसाठी आर्थिक निर्बंध उठविले…

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असणारी औषधे, उपकरणे, यंत्रसामुग्री तसेच इतर साहित्य व सेवांसाठी आवश्यक असणाऱ्या खर्चास आर्थिक निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. यासंबंधीत असणारी, निर्बंधातून सूट देण्याबाबतची प्रकरणे वित्त विभागाकडे मान्यतेसाठी सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार वित्त विभागाच्यावतीने आज या बाबतचे विशेष परिपत्रकात जारी करण्यात आले.

जगभर करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यात सुद्धा अनेक ठिकाणी कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळताना दिसून येत आहे. सध्या राज्यात कोरोनाचे ४७ रुग्ण आढळून पॉसिटीव्ह आढळले आहेत. या विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाची यंत्रणा सज्ज झाली असून, यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना तातडीने करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज वित्त विभागाकडून याबाबतचे विशेष परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

आर्थिक वर्षाच्या अखेरीस अनावश्यक अथवा प्राधान्यक्रम नसणाऱ्या बाबींवरील तसेच खर्च निर्धारित व नियमीत करण्यासाठी काही बाबींच्या प्रस्तावांवर निर्बंध घालण्यात येतात. त्यानुसार १ फेब्रुवारी २०२० नंतर अशा बाबींच्या खरेदीस मान्यता देण्यात येत नाही. मात्र औषध खरेदीवरील बाबींना यामध्ये अपवाद करण्यात आलेले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here