Skip to content Skip to footer

रक्त संकलन करण्याचा सिद्धिविनायक मंदिर न्यासाचा उपक्रम…

रक्त संकलन करण्याचा सिद्धिविनायक मंदिर न्यासाचा उपक्रम…

सध्या जगभरात कोरोना या व्हायरसने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताच्या साठ्याची आवश्यकता भासू शकते. याचं पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आव्हान केले आहे. या आव्हानाला साथ देत सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्यावतीने रक्त संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये राहणाऱ्या, ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे, त्यांनी आपले नाव श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात दूरध्वनीद्वारे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत नोंदवावे. रक्तदात्याच्या घराच्या जवळ, थेट सोसायटीच्या आवारात श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्यावतीने महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाची रक्त संकलन व्हॅन पोहचवण्यात येईल. त्यामुळे रक्तदात्याला राहत्या ठिकाणी रक्तदान करता येईल.

Leave a comment

0.0/5